जंववरी रे तंववरी
जंववरी तंववरी जंबूक करी गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥१॥ जंववरी तंववरी वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाहीं बाप ॥२॥ जंववरी तंववरी मैत्रत्व-संवाद । जंव अर्थेसि संबंध पडिला नाहीं बाप ॥३॥ जंववरी तंववरी युद्धाची मात । जंव परमाईचा पूत देखिला नाहीं बाप ॥४॥ जंववरी तंववरी समुद्र करी गर्जना । जंव अगस्ती ब्राह्मणा देखिलें नाहीं बाप ॥५॥ जंववरी तंववरी बाधी हा संसार । जंव रखुमादेविवर देखिला नाहीं बाप ॥६॥