PrintSource

जय देवी मंगळागौरी

Jay Devi Mangalagauri

पी. सावळाराम

जय देवी मंगळागौरी
सुवासीन मी तुला पूजिते

कुंकुमतिलक माझ्या ललाटी
मंगलमणी हे शोभत कंठी
रत्‍नपाचूचा चुडा मनगटी
स्त्रीजन्माचे अहेव लेणे
तुझ्या कृपेने मला लाभते

शिवशंकराहुनी प्रेमळ भोळा
दिधलासी पती तू भाग्यवतीला
देहाच्या देव्हारी पूजीन त्याला
हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती
अमृत तेजाळ प्रीत जळते