एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान जय जवान, जय किसान ! जय जवान, जय किसान, जय जय ! अखिल देश पाठीशी, 'जवान' व्हा रणी चला किसान होउनी कसा, भूमी सस्य श्यामला यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान जय जवान, जय किसान ! शत्रू-मित्र जाणुनी सावधान सर्वदा आपल्या श्रमे करू प्रसन्न देवी अन्नदा उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान जय जवान, जय किसान ! अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधु आसमान जय जवान, जय किसान !