जय जय विठ्ठल रखुमाई
पंढरीच्या त्या देवमंदिरी गजर एक होई जय जय विठ्ठल रखुमाई क्षेत्र असे हे परमार्थाचे पावन जीवन हो पतितांचे पुंडलिक तो पावन झाला प्रभु-मंगल पायी द्वारावतीचे देवकिनंदन गोरोबास्तव भरती रांजण विदुराघरच्या कण्या घेतसे श्याम शेषशायी आसक्तीविण येथे भक्ती प्रभु नांदतो त्यांच्या चित्ती चिंतन करता चिरंतनाचे, देव धाव घेईं