जय शारदे वागीश्वरी
जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी ज्योत्स्नेपरी कांती तुझी मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे नित् वर्षु दे अमुच्या शिरी वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली संगीत जन्मा ये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी