जे वेड मजला लागले, तुजलाही ते लागेल का? माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का? मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी जे मी मुकेपणी बोलतो शब्दांत ते रंगेल का? हा खेळ घटकेचा तुझा घायाळ मी पण जाहलो जे जागले माझ्या मनी, चित्ती तुझ्या जागेल का? माझे मनोगत मी तुला केले निवेदन आज, गे सर्वस्व मी तुज वाहिले तुजला कधी उमगेल का?