जेथें जातों तेथें तूं माझा
जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती । चालविसी हातीं धरुनियां ॥१॥ चालों वाटे आह्मीं तुझाचि आधार । चालविसी भार सवें माझा ॥२॥ बोलों जातां बरळ करिसी तें नीट । नेली लाज धीट केलों देवा ॥३॥ अवघें जन मज जाले लोकपाळ । सोईरे सकळ प्राणसखे ॥४॥ तुका ह्मणे आतां खेळतों कौतुकें । जालें तुझें सुख अंतर्बाहीं