झिणिझिणि वाजे बीन सख्या रे, अनुदिन चीज नवीन कधिं अर्थाविण सुभग तराणा कधिं मंत्रांचा भास दिवाणा सूर सुना कधिं केविलवाणा शरणागत अतिलीन कधिं खटका, कधिं रुसवा लटका छेडी कधिं प्राणांतिक घटका कधिं जिवाचा तोडुन लचका घेतें फिरत कठीण सौभाग्यें या सुरांत तारा त्यांतुन अचपळ खेळे पारा अलख निरंजन वाजविणारा सहजपणांत प्रवीण