झुळझुळे नदी ही बाई
झुळझुळे नदी ही बाई देहलतेला शीतल करुनी आनंदाने गाई पानफुलांनी तरुवर फुलती पाण्यावरती तरंग झुलती सुरेल मुरलीनादे घुमते ती अंब्याची राई सुखात का ग खुपते काही? श्याम सावळा भेटत नाही राधेला का छळिती गोपी, कळत कसे ग नाही या पाण्यावर हृदय उमलते हृदयातुनी का गुपित उकलते नको गुपित ते उकलाया ग, अबोलीच मी राही