झुळूक आणखी एक- आणखी एक पान गळलें ! पानीं फुलला सुमनिं बहरला माझ्या अंगणिं जरि तरू वठला शुष्क डहाळिंत अंग मोडिती कोंब नवे इवले ! - आणखी एक पान गळलें ! चंद्रकोर अंगांगीं भरली दिनदिन कणकण उजळुन खिरली परि अवसेच्या प्रभात-ओटिंत सूर्यबिंब भरले ! - आणखी एक पान गळलें ! खुशाल गळतां, गळा दळांनो हसत सरा माझिया क्षणांनो बघे क्षणांच्या पानझडिंत मी अक्षयपण उमले ! - आणखी एक पान गळलें !