जो या नगरा भूषण
जो या नगरा भूषण खरा । जैसा भाळीं शोभे हिरा । ज्याच्या सद्गुणगानीं गिरा । रंगली सुजनांची ॥ निर्धन असतां धनदापरी । औदार्यातें अंगी धरी । दुर्दैवानें छळिलें तरी । शील न सोडी जो ॥ करि जो दीनावरतीं दया । लोकीं वागे पाहुनि नया । वाहिली ही मीं काया तया । निर्मल भावानें ॥