ज्यास देव सापडला माणसाच्या ठायी त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्व दाही करुणेची निरांजन आत सांडते प्रकाश त्याचे तन-मन पूजा आणि गाभारा आकाश धूप वसंताचा तेथे दरवळून येई दु:ख पाहुनी दुसर्याचे ज्याचे भरतात डोळे डोळ्यांतल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायास आले अशा माणसाचा स्पर्श पांडुरंग होई धर्म पावसाचा अंगी ज्यास नसे नाव अंकुरते जेथे जेथे तेच त्याचे गाव असे गाव ज्याचा कोठे नकाशाच नाही