का धरिला परदेश सजणा
का धरिला परदेश, सजणा का धरिला परदेश? श्रावण वैरी बरसे झिरमिर चैन पडेना जीवा क्षणभर जाऊ कोठे, राहू कैसी, घेऊ जोगिणवेष? रंग न उरला गाली ओठी भरती आसू काजळकाठी शृंगाराचा साज उतरला मुक्त विखुरले केश