काल मी रघुनंदन पाहिले
काल मी रघुनंदन पाहिले श्याममनोहर रूप पाहता, पाहतची राहिले ! विसरून मंदिर विसरून पूजा मने पूजिला तो युवराजा अबोध कसले अश्रू माझ्या डोळ्यांतून वाहिले ! वीरवेष ते तरुण धनुर्धर जिंकून गेले माझे अंतर त्या नयनांचे चंद्रबाण मी हृदयी या साहिले ! रुपले शर ते अजुनी खुपती एक दृश्य ते डोळे जपती प्रिये मांडवी, जीवित माझे त्यांना मी वाहिले !