काल रात सारी मजसी झोप नाही आली जीव झाला थोडा थोडा ऊर वरखाली ! पती दूरदेशी माझे रूप माझे मजसी ओझे मध्यान्हीच्या पारी दारी एक थाप आली ! कशी आत घेऊ चोरा? कशी उघडू मी दारा? पांचमाळ्यावरती माझी कोपर्यात खोली ! कोण आसुसला पापा पुन्हापुन्हा मारी थापा कलंडले मंचकी मी, मूर्च्छनाच आली ! काच कवाडाची होती पतंगास कळली ना ती भरारून तोचि होता येत हो महाली ! काचेवरी त्याची झेप तीच मला वाटे थाप अशी तुझी मैत्रिण बाई पांखरास भ्याली !