काय बाई सांगू
काय बाई सांगू? कसं ग सांगू? मलाच माझी वाटे लाज काहीतरी होऊन गेलंय आज ! उगीच फुलुनी आलं फूल उगीच जिवाला पडली भूल त्या रंगाचा त्या गंधाचा अंगावर मी ल्याले साज काहीतरी होऊन गेलंय आज ! जरी लाजरी झाले धीट बघत राहिले त्याला नीट कुळवंताची पोर कशी मी विसरून गेले रीतरिवाज? काहीतरी होऊन गेलंय आज ! सहज बोलले हसले मी मलाच हरवुन बसले मी एक अनावर जडली बाधा नाही चालला काही इलाज काहीतरी होऊन गेलंय आज !