काय बाइ स्वारींची ती
काय बाइ स्वारींची ती ऐट बोलण्याची तर्हा गोड ओठामधुनी हळुंच हांसण्याची वळुनी पाहतांना इकडे करिति काळजाचे तुकडे चिडविण्यांत मजला होई जोड विनोदाची आणि कनी भलत्या वेळीं मित्रमंडळींच्या मेळीं फेकिताती तिथुनी गालीं मूठ गुलालाची मंदमलय अनिलावरती हृदयकुसुम डुलते प्रीती कळी कळी खुलते माझ्या पारिजातकाची लाविल्या किती फुलवाती प्रणयरम्य शेजेवरती मिटुनि नेत्र शेजारति ही प्राणवल्लभाची