कधी रिमझिम झरणारा
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला कधी टपोर्या थेंबांचा आला ऋतू आला कधी पुलकित हर्षाचा, हळव्या क्षण स्पर्शाचा आला ऋतू आला पानावर थिरकत नाचे पाणी मनामध्ये झुलतात गाणी दिवाणी साद गंधातुनी, ओल्या मातीतुनी आला ऋतू आला अंग अंग स्पर्शताती मोती रुपेरी आठवे ती अनावर भेट अधुरी मन चिंब ओले, शहारत बोले आला ऋतू आला हा पाऊस वागे तुझ्यासारखा हा येतो नि जातो तुझ्यासारखा ऊनपावसाचा, खेळ श्रावणाचा आला ऋतू आला