कधी तू हसावे कधी तू रुसावे नको ग नको ग नको साजणी ! सखी प्रीत माझी तुला वाहिली तुझी मूर्त डोळ्यांत मी पाहिली नको हा बहाणा, असा दूर जा ना नको ग नको ग नको साजणी ! कळी लाजरी ही फुलेना कशी तिला भावना ही कळेना कशी मुखी गोड भाषा, अशी ही निराशा नको ग नको ग नको साजणी ! प्रिये राहसी तू मनी मानसी जगावेगळी तू अशी प्रेयसी मलाही कळावे, तुलाही जुळावे नको ग नको ग नको साजणी !