कळला रे राया मला
कळला रे राया मला, तुला लागलेला छंद ! कुणालागी आठवीता सैल झाले बाजूबंद? सैल झाले बाजूबंद कुणाच्या रे यौवनाचा गालिचा हा मखमली? मळविती सराईत नजरेच्या चोरचाली नाही उतरली धुंद कुणाच्या ही कुंकवाची लांब पुसटली चिरी? उमटले मीलन राया तुझिया खांद्यावरी चोरभेटीचा आनंद नयनांच्या लालीतून दिसे छ्बी रंगलेली का रे उचकी लागली कुणी आठवण केली कुण्या डोळ्याचा हा फंद