कळ्यांचे दिवस फुलांच्या
कळ्यांचे दिवस फुलांच्या राती येती नि जाती, येती नि जाती ! नवल असे घडते काही स्वप्नात स्वप्न पडते बाई सख्याचा स्पर्श, अनोखा हर्ष प्रीतीच्या सारिका मंजुळ मंजुळ गाती ! वार्याची झुळुक झुलतो झुला क्षणात उंच नेतसे मला सांजेचे रंग, धुंद तरंग पाचही प्राण सुखात सुखात न्हाती !