कमोदिनी काय जाणे
कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आह्मीच तें प्रेमसुख जाणों ॥२॥ माते तृण बाळा दुधाचि ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥३॥ तुका ह्मणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥४॥