कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥ कानडा विठ्ठल नामें बरवा । कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥ कानडा विठ्ठल रूपे सांवळा । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥ कानडा विठ्ठल चंद्रभागें तटीं । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥ कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥ वेधियेलें मन कानड्यानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवेचि ॥६॥