कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आह्मांसि कां दिली वांगली रे ॥१॥ स्व-गत सच्चिदानंदें मिळोनि शुद्ध सत्त्व-गुणें विणली रे । षड्-गुण गोंडे रत्न-जडित तुज श्याम-सुंदरा शोभली रे ॥२॥ षड्-विकार षड्-वैरी मिळोनि ताप-त्रयें जी विणली रे । नवा ठाईं फाटुनि गेली त्वां आह्मांसि दिधली रे ॥३॥ ऋषि मुनि ध्यातां मुखीं नाम गातां संदेह-वृत्ति विरली रे । बाप रखुमादेवीवरे विठ्ठले त्वत्-पदीं वृत्ति मुरली रे ॥४॥