कंठ आणि आभाळ दाटून येती आणि कोसळती सरीवर सरी ! पहिल्या उन्हाची हळद ओली होती फांदीवर पाने जन्म घेत होती भवताल त्यांना अजून ठाऊक नव्हता अशा वेळी आल्या सरीवर सरी ! आणि कोसळल्या सरीवर सरी ! आता कुठे नुकतेच पंख लांब केले आता कुठे घरट्यातून फांदीवर आले आभाळ या पिलांचे खूप लांब आहे अशा वेळी आल्या सरीवर सरी ! आणि कोसळल्या सरीवर सरी ! उधाण आहे आकाश पेलताना उभ्या जन्माचा पाऊस झेलताना स्वत:चे स्वत:शी लढणे दिनरात आहे अशा वेळी आल्या सरीवर सरी ! आणि कोसळल्या सरीवर सरी !