करी दिवसाची रात, माझी सोडी ना वाट याच्या डोक्यात अक्कल पिकवा कुणी माझ्या रायाला शानपन शिकवा ! आडवाटेनं हेरतो मला तर्हेतर्हेची करतो कला कुणी रायाचा रस्ता चुकवा माझ्या रायाला शानपन शिकवा ! किती किती सवाल याचं घेऊ? किती किती जवाब मी देऊ? बोल बोलून आला थकवा माझ्या रायाला शानपन शिकवा ! नाही इचार मनात दुसरा याच्या गाडीला लागलाय घसरा लाल कंदील याला कुणी दाखवा माझ्या रायाला शानपन शिकवा !