करिते जीवनाची भैरवी
सीमा झाली सोसण्याची, परि दुःख संपले नाही करिते जीवनाची भैरवी ! हे काय जिणे नित दुःख पिणे, रडतारडता सुख भासविणे नाती फिरली, प्रीती फिरली, माझे कुणी उरले नाही ! मज तार अता, वा मार अता, मन बावरले तनु सावरता ही काय दशा, हे परमेशा, ये धावुनिया लवलाही !