कसा मला टाकुनी गेला
कसा मला टाकुनी गेला राम ॥१॥ रामाविण जीव व्याकुळ होतो । सुचत नाहीं काम ॥२॥ रामाविण मज चैन पडेना । नाहीं जिवासी आराम ॥३॥ एका जनार्दनीं पाहुनी डोळा । स्वरूप तुझें घनश्याम ॥४॥