कसली जिवाला भूल पडे
कसली जिवाला भूल पडे? हरीच्या मुरलीवर जीव जडे ! श्यामल श्यामल मेघां बघुनी श्याममयी मी जाते बनुनी स्वप्न म्हणू की हे जागेपण, माझ्यासंगे नाचे मोहन ! श्याम श्याम श्याम घनश्याम श्याम श्याम श्याम श्याम श्याम मुखी हेच नित्य नाम, संसार मनातुनी गळून पडे ! मज वेडीला निंदा-वंदा मी तर वरीले बाल मुकुंदा लाज मजसी, मजसी न भीती, माझी हरीवर अक्षय प्रीती ! श्याम श्याम श्याम घनश्याम श्याम श्याम श्याम श्याम श्याम मुखी हेच नित्य नाम, त्याच्याविण माझा श्वास अडे !