कशास रुसवा सखये धरिला
कशास रुसवा सखये धरिला गालावरच्या खळीत भरला गोड तुझा कावा ओठ पाकळ्या विलग जाहल्या जाई-जुईच्या कळ्या बहरल्या वदनी लाल अनुराग रंगला खुलल्या गाली सखी मोहरला गोड तुझा कावा लाबाड डोळे लाडिक चाळे भृधनू रोखुनी बघती लाडके मदनबाण हा नयनामधला अंतरी तुझिया मी ओळखला गोड तुझा कावा