कशी जाऊं मी वृंदावना । मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥ पैलतीरीं हरी वाजवी मुरली । नदी भरली यमुना ॥२॥ कांसे पीताम्बर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥३॥ काय करूं बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ॥४॥ नंदाच्या हरीनें कौतुक केलें । जाणे अंतरींच्या खुणा ॥५॥ एका जनार्दनीं मनीं ह्मणा । देवमाहात्म्य कळेना कोणा ॥६॥