कशि केलीस माझी दैना रे मला तुझ्या बिगर करमेना ! घडिभरी माझिया मना, चैन पडेना, झोप येईना रे मला तुझ्या बिगर करमेना ! तू राघु तुझी मी मैना माझं रूप बिलोरी ऐना अंगी इष्काचा आजार, करी बेजार, कमति होई ना चैन पडेना, रे मला तुझ्या बिगर करमेना ! तू हकीम होऊनि यावे एकान्ती औषध द्यावे दे चुंबन साखरपाक, मिठीचा लेप, मजसि साजणा मनमोहना, रे मला तुझ्या बिगर करमेना !