PrintSource

कशी रे आता जाऊ घरी

Kashi Re Aata Jau Ghari

रजनीकांत राजाध्यक्ष

कशी रे आता जाऊ घरी, सांग मला श्रीहरी
कशी मी आता जाऊ रे?

तव मुरलीने होता व्याकुळ
आले धावून निजता घरकुल
झाले आता जागे गोकूळ, तुझ्यासवे मी तरी

गुज निशेचे अजून नयनी
लपवू कसे बघ मिटे पापणी
ओळखिले रे दंवबिंदूंनी या भिजल्या प्रहरी

राधा तव ही सासुरवाशिण
संसाराचे भवती रिंगण
भान न त्याचे तुझेच चिंतन करित राहिले उरी