कशी संपली रात ! कळेना, कशी संपली रात ! वीणा छेडित एक कराने कुरवाळीत तव केश दुजाने आताच ना मी बसले होते जयजयवंती गात ! चांद अभाळी कधी उगवला कळले नाही कधी मावळला चढत्या-ढळत्या स्वरलहरींच्या मादक आलापात ! गुपित लाडके गीतामधले पुन्हापुन्हा मी ओठी घोळिले गाण्यातच त्या विसरून गेले दोघांतील एकान्त !