कशि तुज समजावुं सांग
कशि तुज समजावुं सांग? कां भामिनि उगिच राग? हास्याहुनि मधु रुसवा हेमंतीं उष्ण हवा संध्येचा साज नवा हा का प्रणयानुराग? चांफेकळि केविं फुले? ओष्ठकमल जेविं उले? भोंवतिं मधु गंध पळे कां प्रसन्न वदन-राग? वृत्तींचा होम अमुप त्यांत जाळुं गे विकल्प होउनियां निर्विकल्प अक्षय करुं यज्ञयाग ओठांचे फेड बंध गाइं गडे मुक्त छंद श्वासांचे करुं प्रबंध हृदयांचें मधु प्रयाग