आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी ! मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी ! त्यांच्यासमान नाही येथे कुणी विचारी, आजन्म फक्त केला त्यांचा विचार त्यांनी ! त्यांना पसंत नाही ताजा पहाटवारा, आधीच बंद केले एकेक दार त्यांनी ! झाली जशी निकामी त्यांची जुनी हत्यारे, माझ्यावरी दयेचा केला प्रहार त्यांनी ! माझ्या घरात आला पाऊस माणसांचा.. त्यांच्या घरात नेला त्यांचा पगार त्यांनी !