केळीचे सुकले बाग असुनियां पाणी कोमेजलिं कवळीं पानं असुनि निगराणी केळीचे सुकले बाग अशि कुठें लागली आग जळति जसे वारे कुठें तरी पेटला वणवा भडके बन सारे केळीचे सुकले बाग किति दूरचि लागे झळ आंतल्या जीवा गाभ्यांतिल जीवन रस सुकत ओलावा केळीचे सुकले बाग किति जरी घातलें पाणी सावली केली केळीचे सुकले- प्राण बघुनि भवतालीं केळीचे सुकले बाग