केतकीच्या बनी तिथे
केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर पापणीत साचले अंतरांत रंगले प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले ओठांवरी भिजला ग आसावला सूर भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले धुक्यांतुनी कुणी आज भावगीत बोलले डोळियांत पाहिले कौमुदीत नाचले स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले झाडावरी दिसला ग भारला चकोर