केव्हातरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे हरवून रात गेली सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे? उसवून श्वास माझा फसवून रात गेली ! कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा निसटून रात गेली उरले उरात काही आवाज चांदण्याचे.. आकाश तारकांचे उचलून रात गेली ! स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली !