PrintSource

खरा ब्राह्मण नाथची झाला

Khara Bramhan Nathachi

पी. सावळाराम

खरा ब्राह्मण नाथची झाला
जो महारा घरी जेवला

गोदावरीचे करुनी स्‍नान
पवित्र पावन नाथा देखुन
दुष्ट थुंकितो अंगावरती
क्रोध जाळितो शंभरवेळा

पददलितांचे मूल तान्हुले
रडता स्फुंदुन कडे घेतले
मुके पटापट घेता त्याचे
हसवी खुदुखुदु बालप्रभुला

घरात आमुच्या पुरणपोळी
तुमच्यासाठी नाथा केली
महाराची ती पोर बोलता
बोट धरुनी संत चालला

धूप घालता सुवास सुटला
मागेपुढती पाट मांडिला
नाथांनी मुखी घास घालता
पुंडलिक वरदा हरी बोला