खेळताना रंग बाई होळीचा होळीचा फाटला ग कोना माझ्या चोळीचा आम्ही तरण्या ग पोरी जमलो गावा बाहेरी सख्याची आली स्वारी उडविली ती पिचकारी घातला ग घेरा त्यानं टोळीचा, टोळीचा फाटला ग कोना माझ्या चोळीचा झणि पाऊल अवघडलं आणि काळीज धडधडलं काय सांगू मी पुढलं क्षणातच सारं घडलं जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा फाटला ग कोना माझ्या चोळीचा मला काही समजंना मला काही उमजंना त्याला कोणी सांगंना कुणाला तो ऐकंना डाव साधला ऐनवेळीचा, वेळीचा फाटला ग कोना माझ्या चोळीचा