खोडी माझी काढाल तर
खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाईट घटकेमध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट ! अंगावरती याल तर असा देईन ठोसा कोपर्यात जाउन तुम्ही रडत बसा ! बजरंग माझा भाऊ भीम माझा काका सांगुन ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका ! दंड माझे पाहा कसे रोज दूध पितो अंगामध्ये ताकद आहे मग कोण भितो?