PrintSource

किती दिसांनी आज भेटसी

Kiti Disani Aaj Bhetasi

ग. दि. माडगूळकर

किती दिसांनी आज भेटसी, पुसशी कुशल मला
तुझ्याचसाठी झुरते मनी मी, कैसे सांगू तुला

प्रीतीची वचने राजा, विसरू कशी?

दिवस सहज निघुनी जातो
रात्री तुझा आठव येतो
अश्रुंनी माझी भिजुनी जाई उशी

मानभावी पुरुषी वाणी
फुलपाखरांची गाणी
स्त्रीजाती वेडी भुलुनी पडते फशी

एकवार मधुकर येतो
चैत्रमास चाखुन जातो
स्वप्‍नाळू राही फुलवेली वेडीपिशी