किति सांगुं तुला मज
किति सांगुं तुला मज चैन नसे ॥ हें दु:ख तरी मी साहुं कसें । या समयिं मला नच कोणि पुसे । हा विरह सखे मज भाजितसे । मन कसें आवरूं । किति धीर धरूं । कसें करूं ॥ हे बंधु नव्हत मम वैरि खरे । दावीती कसें वरि प्रेम बरें । बोलोनी पाडीती हृदयासी घरे । नको नको मला जिव । विष तरि पाजिव । सखे सोडिव ॥