कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस ! रंगीबेरंगी फुलांना लागे प्रकाशाचा ध्यास ! आज बर्याच दिसांनी झाले मोकळे आभाळ ! दूर तरळे ढगांची शुभ्र मुलायम माळ ! किती दिसांनी पडले ऊन्ह पिवळे धमक, किरणांच्या वर्षावात न्हाते सावळी सडक ! आणि पाहता सहज जरा मान वळवून, कैफ जुनाच दाटला माझ्या नसांनसांतून तोच मोहक चेहरा, त्याच गोड खळ्या गाली, "आले भरून आभाळ पुन्हा वीज चमकली !"