कोकिळ कुहुकुहु बोले तू माझा, तुझी मी झाले ऋतुराजा तुझी वासंती तरूतळी इथे एकान्ती करकोमल देता हाती चांदण्यांत दिवसा न्हाले मोहरून डहाळीवरती आपुली हिंदोळत प्रीती निर्झरात टिपण्या मोती पाखरु जिवाचे आले तू येता सखया जवळी फुलवेल तरूला कवळी मधुमरंद भरतो कमळी अंतरात मिटता डोळे