PrintSource

कोसळले गगन जरी

Kosalale Gagan Jari

वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे

कोसळले गगन जरी
मी हा खंबीर उभा
पोलादी बाहूंवर
सावरीत क्षुद्र नभा

सावरीत क्षुद्र नभा
हसलो मी मुक्त हसे !
प्रलयजळी बुडताना
तोच कुणी जीव दिसे.

बळ असून दुर्बळ मी
शल्य वागवीत उभा
बाहूंतिल थिजले बळ
सावरीत क्षुद्र नभा..