कृष्ण माझी माता
कृष्ण माझी माता । कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता । कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरू । कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू । भवनदीची ॥२॥ तुका ह्मणे माझा । श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा । परता जीवा ॥४॥