कुणाला प्रेम मागावे
कुणाला प्रेम मागावे? जिवाचे दु:ख सांगावे? मृगजळी का तरंगावे कुणाला गात रंजावे? तूच ना प्रीतिचा पेला दिला पण पालथा केला तळमळे जीव तान्हेला कुणासाठी जगी जगावे? तुझ्या शृंगारलीला या बिचारी मोहिनीमाया किती आशेवरी वाया- खुळ्या जिवास टांगावे? साथीचा साज विस्कटला सूरांचा मेळ मग कुठला दिलाचा दिलरूबा फुटला कसे गाणे अतां गावे?