कुणाला सांगू माझी व्यथा
कुणाला सांगू माझी व्यथा? प्राजक्ताच्या प्रासादावर पडली विद्युल्लता ! प्रलयाचे हे भीषण तांडव, डळमळला गगनाचा मांडव थरथरत्या पृथ्वीवर नाचे तिमिरदैत्य एकटा ! कशास घडल्या अपुल्या भेटी, कशास जडली वेडी प्रीती मीलन अपुले ठरली आता स्वप्नामधली कथा ! कोण निवारील घोर अनर्था, तूच प्राण तू जीवन पार्था ये विझवाया हा दावानल शिंपाया अमृता !